Reading Skill In Marathi Mahiti मित्रांनो, आज आपण वाचन कौशल्य मराठी माहिती या संदर्भामध्ये Reading Skill In Marathi Mahiti लेख अभ्यासणार आहोत. आपण हा लेख आवश्यक वाचा वाचल्यानंतर आवडल्यास आपल्या मित्रांना वाचण्यासाठी शेअर करा.जगातील प्रत्येक व्यक्तीला वाचन कौशल्याची संकल्पना महत्त्वाची असून प्रत्येकाने आपले वाचन कौशल्य विकसित करणे आजच्या आधुनिक काळात लहानपासून वाचन कौशल्य विकसित करणे आवश्यक आहे. Reading Skill In Marathi Mahiti
![]() |
Reading Skill In Marathi Mahiti |
मित्रांनो,जगातील कोणत्याही व्यक्तीला स्वतःचा सर्वांगीण विकास करण्यासाठी त्यांच्या अंगामध्ये अनेक कौशल्य असणे आवश्यक आहे. व्यक्तीच्या जडणघडणीमध्ये अनेक कौशल्य त्याचा सर्वांगीण विकास करीत असते. जसे श्रवण कौशल्य, वाचन कौशल्य ,लेखन कौशल्य आणि भाषण कौशल्य हे सर्व कौशल्य महत्वपूर्ण कौशल्य आहे. या अनेक कौशल्य पैकी मित्रांनो, आज आपण ' वाचन कौशल्य मराठी माहिती ' याबाबत सविस्तर माहितीचा अभ्यास या लेखांमधून पाहूया. Reading Skill In Marathi Mahiti
मित्रांनो, जीवनात प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी अनेक वर्ष लागतात. अनुभव घेण्यासाठी अनेक पुस्तकाचे वाचन केल्यास वाचनामुळे माहिती स्मरणात राहते. स्मरणात राहिलेली माहिती कधी विसरू शकत नाही. अनुभव घेण्यासाठी अनेक वर्ष खर्च करावी लागतात. पण असे काही अनुभव आहे की आपण पुस्तकाचे नियमित वाचन केल्यास आपणास अनुभव प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. अनुभवातून व्यक्ती शहाणी होतात. शहाणी होण्यासाठी पुस्तकाचे वाचन होणे आवश्यक आहे. वाचन कौशल्यामध्ये फार मोठे सामर्थ्य दडलेले आहेत. त्यामुळे ब्लॉगर ने वाचन कौशल्य मराठी माहिती .या विषयावर लेख लिहून सविस्तर माहिती या लेखात स्पष्टपणे नमूद केली आहेत. Reading Skill In Marathi Mahiti
Reading Skill In Marathi Mahiti
मित्रांनो, ज्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तीच्या घरात एक देवघर असते त्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तीच्या घरात अनुभवप्राप्तीसाठी एक पुस्तकाचे ग्रंथालय असणे आवश्यक आहे. आपल्या अभ्यासाला पूरक साहित्य म्हणून आपल्या घरातील ग्रंथालयातील संदर्भ वाचनासाठी उपयुक्त ठरते. शाळा किंवा कॉलेज यामध्ये जाणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याजवळ पाठ्यपुस्तके असतात. या पाठ्यपुस्तकाचे ज्ञान चांगले अवगत करण्यासाठी वाचन कौशल्य विकसित करण्याची गरज आहे. 'Reading Skill In Marathi Mahiti' पुस्तकाच्या वाचनाबरोबर इतरही अनेक पुस्तकाचे वाचन होणे आवश्यक आहे. पुस्तकांचे आणि संदर्भ साहित्याचे वाचन केल्यामुळे विद्यार्थ्यांचे किंवा व्यक्तीचे व्यक्तिमत्व वाचन कौशल्यातून विकसित होऊन विद्यार्थी परीक्षेत आणि शैक्षणिक गुणवत्तेमध्ये नेहमी अव्वल दर्जाचा ठरतो.Reading Skill In Marathi Mahiti
मित्रांनो, आपण रस्त्याने चालताना अनेक दुकानाच्या पाट्यांचे नाव वाचतो. गाडीच्या नेमप्लेटचे नंबर वाचतो. रस्त्याने चालताना आपल्यासमोर काही वेळेस बॅनर येते, त्याचेही सुद्धा आपण वाचन करतो. रस्त्याने चालताना वाचलेल्या संपूर्ण माहिती चे वाचन करत असतो. अशा प्रकारचे वाचन काही क्षणापर्यंत आपल्या स्मरणात राहते. कालांतराने दुकानाच्या पाट्या किंवा गाडीचे नंबर प्लेट विसरून जाते. याचे मुख्य कारण म्हणजे आपण रस्त्याने चालताना चांगल्या प्रकारचे स्मरण न करता फक्त वाचक पुढे पुढे चालत राहतो. आपण वाचलेली रस्त्यावरील संपूर्ण माहिती विस्मरण होऊन जाते. अशाच प्रकारे मित्रांनो ,. ' Reading Skill In Marathi Mahiti 'आपण आपल्या जवळच्या पुस्तकाचा अभ्यास केला तर तो अभ्यास विस्मरण होण्याची दाट शक्यता असते.Reading Skill In Marathi Mahiti
पुस्तकाचे वाचन हे मन प्रसन्न करून आनंदाने लक्षात राहील अशा प्रकारे करावे. म्हणजेच स्मरणात राहील अशा प्रकारे पुस्तकाचे वाचन करणे आवश्यक आहे. मनापासून कौशल्य पूर्वक वाचन प्रसन्न मनाने केल्यास ते वाचन जन्मभर कधीच विस्मरण होत नाही. जसे देवाला प्रसन्न करण्यासाठी आपण देवदर्शन घेतो. तसे पुस्तकाचे वाचन केले तर पुस्तक प्रसन्न होईल. पुस्तक वाचन कौशल्यामुळे अभ्यासाचे सर्व विषय स्मरणात राहील स्मरणात राहणारी वाचन कधीच विस्मरण होत नाही.मन प्रसन्न करून व्यक्तिमत्व घडवणारा प्रत्येक विद्यार्थी हा पुस्तकाचे वाचन करणारा हवा असतो. पुस्तकाचे वाचन केल्यामुळे पुस्तक तुमच्यावर प्रसन्न होऊन सर्व माहिती तुमच्या लक्षात राहील. पुस्तक वाचन कार्य उत्तम घडल्यामुळे अशा प्रकारचे वाचन परीक्षेत उत्तम गुण मिळून देतात .हे कधी विसरता कामा नये.Reading Skill In Marathi Mahiti
वाचनाचे निरनिराळे प्रकार
जगातील कोणत्याही व्यक्तीला किंवा विद्यार्थ्यांना स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास घडवून जीवनात यशस्वी होण्यासाठी वाचनाचे निरनिराळे प्रकार माहित असणे आवश्यक आहे. मित्रांनो, येथे या ब्लॉग पोस्ट लेखांमध्ये वाचनाचे निरनिराळे प्रकार लेखात खालील प्रमाणे स्पष्टपणे पाहूया. किंवा निरनिराळ्या वाचनाच्या प्रकाराबाबत माहितीचे स्पष्टीकरण खालील प्रमाणे करूया. हे सर्व निरनिराळे वाचण्याचे प्रकार यशस्वी होण्यासाठी चांगले लक्षात असू द्या. Reading Skill In Marathi Mahiti
सर्वेक्षण वाचन प्रकार
वाचनाच्या अनेक प्रकारापैकी सर्वेक्षण वाचन हा एक महत्वपूर्ण वाचनाचा प्रकार आहे. या प्रकारच्या असते. या प्रकारच्या वाचनामध्ये माहिती थोडक्यात समजावून घेण्यासाठी केलेले वाचन असते. वाचनामध्ये एखाद्या पाठाचे शीर्षक, मुद्दे ,व्याख्या, आकृत्या, सूत्रे ,चित्र किंवा विविध उदाहरणे चालणे. ठळक स्वरूपाचा संकल्पना समजावून घेण्यासाठीचे वाचन आहे. हे एक प्रकारचे ठळक वाचन आहेत.सर्वेक्षण वाचनामध्ये ज्या पाठ्यपुस्तकाचे आपण वाचन करत आहोत. त्या पाठ्यपुस्तकातील सदर प्रकरणातील ठळक स्वरूपात मुद्द्यांचे सर्वेक्षणात्मक वाचन करत असतो. वाचन करीत असलेल्या पुस्तकात कोणते मुद्दे महत्त्वपूर्ण आहेत. कोणत्या व्याख्या सोप्या आहेत. कोणत्या कल्पना अवघड आहेत .कोणते मुद्दे महत्त्वपूर्ण नाहीत. पुस्तक वाचनातून काय शिकायचे आहेत. पुस्तकात कोणत्या गोष्टी कठीण आहे. कोणत्या गोष्टी सोप्या Reading Skill In Marathi Mahiti याचे अवलोकन करण्यासाठी सर्वेक्षण वाचन करण्याची गरज आहे.Reading Skill In Marathi Mahiti
सखोल वाचन प्रकार
मित्रांनो, सर्वेक्षण वाचनामध्ये आपण फक्त पुस्तक चाललेले असते. सखोल वाचन हे अतिशय महत्त्वपूर्ण वाचन आहे. सखोल वाचनामध्ये पुस्तकातील सर्व प्रकरणाच्या बाबतीत सखोल अभ्यास होणे आवश्यक आहे. सखोल पुस्तकातील सर्व मुद्दे समजावून वाचणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी सखोल पुस्तकातील प्रत्येक प्रकरणाचा सखोल अभ्यास आवश्यक आहे. प्रत्येक प्रकरणातील सर्व समजावून घेण्याची गरज आहे. प्रकरणातील सर्व वाक्य, व्याख्या, सूत्रे, उदाहरणे आणि दृष्टांत या संबंधित सर्व बाबी लक्षात राहील अशा प्रकारचे सखोल वाचन होय. सखोल वाचन केल्यानंतर जो भाग आपणास समजला नसेल किंवा काही उदाहरणे सोडवता आली नसेल तर ते आपल्या वर्ग शिक्षक किंवा विषय शिक्षक यांच्याकडून अचूक रीतीने समजावून घेणे आवश्यक आहे. प्रकरण वाचनातील कोणते प्रश्न महत्त्वपूर्ण आहेत. त्या प्रश्नांचे उत्तरे कशाप्रकारे लिहिता येईल याचाही समावेश सखोल वाचणार आल्याशिवाय राहत नाही. पुस्तकातील काही भाग समजला नसेल तर त्यासाठी संदर्भ ग्रंथ किंवा संदर्भ साहित्याची मदत घेऊन तो भाग समजावून घेण्यासाठी सखोल वाचन आवश्यक आहे. सखोल वाचनात प्रकरणाचा संपूर्ण आशय स्पष्ट करून ज्ञान संपादन करण्यासाठी सखोल वाचन करणे आवश्यक आहे. Reading Skill In Marathi Mahiti
मनन प्रकार
विद्यार्थी मित्रांनो, मनन करणे हा ही एक वाचनाचा प्रकार आहे. वरील पद्धतीने सखोल वाचन केल्यानंतर आपल्या लक्षात माहिती किती राहिली आहेत, कोणते मुद्दे समजले आहेत. प्रकरण ज्याप्रमाणे क्रमशा वाचन केले आहे त्याचप्रमाणे आठवणे गरजेचे असते. मनन करताना आपण केलेले वाचन आपल्या किती लक्षात आहेत. क्रमशा लक्षात आहे काय? जे आपण वाचले आहेत ते आपल्या खरंच किती लक्षात राहिले आहेत. त्यापैकी किती भाग आपल्या लक्षात राहिला आहे. वाचलेली माहिती स्पष्टपणे आपणास कळली आहे काय? ह्या प्रकारच्या संपूर्ण माहिती वर आपणास प्राप्त झालेल्या मोकळ्या वेळेमध्ये किंवा रात्री शांत वातावरणात मनन करून पाहणे. म्हणून केल्यास किती माहिती लक्षात आहे हे समजून येत असते. शाळेतील मोकळ्या वेळामध्ये विश्रांतीच्या तासामध्ये विद्यार्थ्यांनी मनन करावे. आपण वाचन केलेल्या पुस्तकाबाबत किंवा प्रकरणाबाबत म्हणून करून आपली समजून घेण्याची वृत्ती किंवा अभिवृत्ति ही मनन वाचन प्रकारातून समजून येत असते. मनन किंवा चिंतन प्रक्रियेमध्ये आपण ज्या क्रमाने वाचले आहे त्याच क्रमाने खरोखरच आठवते का हे जाणून घ्या. हे जाणून घेण्यासाठी वाचनाचा मनन हा प्रकार विकसित झाला आहेत. मनन प्रकारास आपण चिंतन प्रकार असे सुद्धा म्हणू शकता. वाचन कौशल्याच्या आधारे वाचन केलेली माहिती आठवण्याची संपूर्ण प्रक्रिया चिंतन प्रकारावर किंवा मनन प्रकारावर आधारित आहे. Reading Skill In Marathi Mahiti
उजळणी प्रकार
वाचन कौशल्याच्या आधारे फक्त आपण वाचन करत पुढे पुढे जात राहिलो तर वाचन केलेली माहिती विस्मरण होण्याची दाट शक्यता असते. एकदा आपण एखादे प्रकरण वाचून टाकून मोकळे झालो नंतर कधी त्याकडे न पाहिल्यास शंभर टक्के विस्मरण झाल्याशिवाय राहत नाही. वाचन केलेले वारंवार नियमित वाचन केले गेले पाहिजे. ज्या गोष्टीचे वारंवार वाचन केले किंवा उजळणी केली तर ती मित्रांनो आपल्या मेंदूत स्मरणात राहते. उजळणी न करता फक्त वाचन करीत असाल तर विस्मरण होणारच. कालांतरानंतर वाचलेल्या माहितीवर उजळणी न केल्यास आपण वाचलेली माहिती चे विस्मरण झाल्याशिवाय राहत नाही. यासाठी वाचन केलेली प्रत्येक गोष्ट वारंवार त्या गोष्टीवर उजळणी करत रहा. उदाहरणार्थ गणितातील पाढे घ्या. एकदा वाचला तर स्मरणात राहणार नाही. तो पाढा लक्षात राहण्यासाठी कमीत कमी 25 वेळेस त्या पाण्याची उजळणी होणे आवश्यक आहे. .
एक धडा किंवा प्रकरण नेहमी नेहमी वाचत रहा. वाचनाच्या आवृत्ती वाढवा. आपलेच लहानपणी वर्ण अक्षर शिकताना ते आपण किती वेळेस उजळणी केली तेव्हा ते आपल्या लक्षात राहिले. वाचलेली माहिती आलेख सूत्र पाढे क्रमाक्रमाने ज्या क्रमाने असतील त्याच क्रमाने उजळणी केली तर मेंदूमध्ये सर्व माहिती चांगल्या प्रकारे साठवून ठेवली जाते. आवश्यक वेळी उजळणी केल्यामुळे मेंदू त्या गोष्टीचे स्मरण विसरु देत नाही. झोपेतून उठला असता त्याला तो शब्द तोंडपाठ सांगता आला पाहिजे. तो फक्त उजळणी करणारा विद्यार्थीच सांगू शकतो.
उजळणी करण्यासाठी पाठी लेखन वही पेन्सिल चा वापर करण्यास हरकत नाही. इंग्रजीचा एक शब्द पाठीवर 100 वेळा लिहून पहा. 100% आपल्या लक्षात राहील. हेच गणित उजळणी प्रकाराचे आहेत. त्यासाठीच वाचनाचा उजळणी हा एक प्रकार पुरातन काळापासून तर आधुनिक काळापर्यंत आजच्या डिजिटल युगात सुद्धा मान्य करावा लागत आहे. उजळणी हा वाचनाचा एक मुख्य प्रकार आहे. या प्रकारामुळे परीक्षेत आपण घवघवीत यश प्राप्त करू शकतो. गणिताचे पाढे पाठ असेल किंवा बेसिक सूत्रे पाठ असतील आणि त्यांची उजळणी केली असल्यास गणित सोडणे सोपे जाते.Reading Skill In Marathi Mahiti
चित्राचे वाचन प्रकार
वाचन कौशल्याचा हा ही प्रकार विकसित झालेला आहे. आपण करीत असलेल्या वाचनाबाबत आपल्या अभ्यासक्रमात वाचन करताना शब्द बरोबर अनेक चित्रे आले त आकृत्या नकाशे तक्ते तरंगचित्र वैज्ञानिक उपकरणे आणि शैक्षणिक साहित्य ह्या गोष्टी ह्या वाचन प्रकारात समाविष्ट केल्या आहेत.
अभ्यासक्रमातील महत्त्वपूर्ण शब्दांचे अर्थ लक्षात राहण्यासाठी चित्र वाचन होणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ लहान मुलाला इंग्रजी शिकवताना अल्फाबेट चित्र दाखवून वाचन करून घेतले जातात. ए फॉर एप्पल, बी फॉर बॅट, सी फॉर कॅट आणि डी फॉर डॉग असे क्रमशा झेड फोर झेब्रा अशा प्रकारचे चित्र दाखवून इंग्रजी वर्ण पूर्ण करून घेतले जातात. मराठीचे वर्णही सुद्धा अशाच प्रकारे चित्र वाचनाद्वारे पाठ करून घेतली जातात. भूगोलातील अनेक संकल्पना व शब्दाचे अर्थ नकाशा व पृथ्वीचा गोल चे वाचन करूनच अभ्यास करण्यात येतो. विद्यार्थ्यांना किंवा लहान मुलांना चित्रे दाखवल्यानंतर चित्राचे निरीक्षण विद्यार्थी करत असतात. चित्राचे निरीक्षण केल्यानंतर त्यावर आधारित माहितीचे वर्णन व्यवस्थित स्पष्टीकरणासह आणि अर्थासह माहिती उपलब्ध होते त्यामुळे वर्गातील चार भिंतीच्या आतील ज्ञानापेक्षा चित्रांचे निरीक्षण करून त्यावर आधारित संकलित केलेल्या माहितीच्या संदर्भातील वाचन प्रकार महत्त्वपूर्ण आहेत. याबाबत तीळ मात्र शंका नाही. Reading Skill In Marathi Mahiti
वाचन कौशल्य विकसित करणारे घटक
मित्रांनो ,आपण उपरोक्त माहिती मध्ये वाचन कौशल्यांच्या प्रकाराबाबत सविस्तर माहिती जाणून घेतल्यानंतर आता आपण वाचन कौशल्य विकसित करण्यासाठी कोणकोणते घटक कारणीभूत आहेत त्या सर्व घटकांबाबत सविस्तर माहिती या लेखातून पाहूया. वाचन कौशल्य विकसित करण्यासाठी घटक किंवा उपाययोजना ह्या पाच प्रकारच्या असून त्याबाबत सविस्तर माहिती पुढील प्रमाणे या लेखात स्पष्टपणे ब्लॉगरने नमूद केली आहे. Reading Skill In Marathi Mahiti
हेतूपूर्वक वाचन
विद्यार्थी मित्रांनो, आपण वाचन कौशल्याच्या संदर्भामध्ये वाचन कौशल्य विकसित करण्यासाठी असणाऱ्या महत्त्वपूर्ण बाबीच्या संदर्भात हेतूपूर्वक वाचन यासंदर्भात माहिती जाणून घेऊया. .
वाचनासाठी हाती घेतलेल्या पुस्तकातून आपण काय वाचत आहे. ह्या पुस्तकातून ही माहिती वाचण्याआधी आपला मुख्य हेतू काय आहेत ही गोष्ट वाचनापूर्वी निर्धारित करावी. आपण उत्तर न शोधता अगोदर मनामध्ये प्रश्न निर्माण करा. आपण वाचत असलेली माहिती वाचण्यामागचा हेतू काय आहे? हा प्रश्न प्रथम आपल्या मनाला विचारा नंतर पुस्तक हातात घ्या. पुस्तक हातात घेतल्यानंतर मना त घेतलेल्या प्रश्नाच्या हेतूनुसार आपल्याला योग्य उत्तर या वाचनातून प्राप्त होते आहे काय हे सुद्धा जाणून घ्या.
आपण पुस्तक वाचत असताना या वाचनाच्या आधारावर कोणता प्रश्न परीक्षेत विचारल्या जाऊ शकतो. असे सर्व प्रश्न मनात तयार करून ठेवा. प्रश्न हे हेतूपूर्वक मनात निर्धारित केलेले असणे आवश्यक आहे. हे प्रश्न निर्धारित केल्यानंतर या प्रश्नांची सर्व उत्तरे आपण वाचत असलेल्या पुस्तकातून किंवा एखाद्या प्रकरणातून योग्य उत्तर सापडले जाऊ शकते. असे सापडलेले उत्तर प्रश्न आणि उत्तर स्वरूपात वहीवर नोंद करून ठेवा. वाचन करताना हेतू डोळ्यासमोर ठेवून वाचन करण्याची पद्धत म्हणजे हेतू वाचन पद्धत होय. वाचन कौशल्य सुधारण्याचा हा एक महत्त्वपूर्ण उपाय किंवा घटक आहे याकडे काळजीपूर्वक लक्ष देऊन वाचन कौशल्य विकसित करावे.Reading Skill In Marathi Mahiti
लक्षपूर्वक वाचन
मित्रांनो लक्षपूर्वक वाचन हा वाचन कौशल्य सुधारण्याचा महत्त्वपूर्ण उपाय असून या उपायाबाबत येथे सविस्तर माहिती पुढील प्रमाणे नमूद करत आहे.
लक्षपूर्वक वाचन प्रक्रियेमध्ये अनेक वर्ण एकत्र येऊन अनेक अर्थपूर्ण शब्द तयार होतात. अनेक अर्थपूर्ण शब्द एकत्र येऊन त्या शब्दा चा संच तयार होऊन एक अर्थपूर्ण वाक्य तयार होते. अनेक अर्थपूर्ण वाक्य एकत्र येऊन त्यापासून एक मोठा पॅरेग्राफ किंवा उतारा किंवा परिच्छेद तयार होत असतो. असे अनेक परिच्छेद एकत्र येऊन एक अर्थपूर्ण प्रकरण तयार होत असते. असे अनेक अर्थपूर्ण प्रकरण एकत्र करून त्यापासून अर्थपूर्ण पुस्तक तयार होते.
मित्रांनो, आपल्या पुस्तक रूपी इमारतीचा पाया मजबूत असेल तर तुमच्यासमोर उभी असणारी पुस्तक रुपी इमारत कितीही मोठी असली तरी ती इमारत भक्कम पायावर उभी राहत असते. या पुस्तका रुपी इमारतीमधील वर्णापासून तर शब्दापर्यंत शब्दापासून तर वाक्यापर्यंत वाक्यापासून तर उच्चारापर्यंत परिच्छेदापर्यंत सर्व व्याकरणाच्या नियमानुसार लक्षपूर्वक वाचन ही प्रक्रिया महत्त्वपूर्ण आहे. .
मित्रांनो, तुम्ही वाचनासाठी घेतलेल्या प्रकरणांमध्ये प्रत्येक शब्दाचा अर्थ तसेच दिलेल्या काना ,मात्रा ,वेलांटी यांचा अर्थ त्यांच्या रूपा नुसार बदलू शकतो. हे आपणास माहीत हवे.
मित्रांनो लक्षपूर्वक वाचनाच्या संदर्भात दिलेल्या वेलांटीच्या फरकाने शब्दाचा अर्थ बदलतो स्वल्पविराम ,अर्धविराम, यासारखी चिन्हे वाक्यात केव्हा वापरावी व वाचन करत असताना त्याचा अर्थ लक्षपूर्वक समजून घेण्याकडे आवश्यक लक्ष असणे गरजेचे असते.
मित्रांनो, विशेष करून आपणास सोपा विषय अवघड वाटणारा म्हणजे इंग्रजी हा विषय होय. या विषयाच्या संदर्भामध्ये काळजीपूर्वक अभ्यास करताना इंग्रजीच्या स्पेलिंग व उच्चाराकडे अधिक काळजीपूर्वक आपण लक्ष देऊन योग्य उच्चारासह आणि स्पेलिंग सह माहिती चे वाचन होणे आवश्यक असते. इंग्रजी विषयांमध्ये बरेच असे शब्द आहे की उच्चार वेगळा होतो. तर उच्चाराप्रमाणे स्पेलिंग तयार होत नाही. .
लिसन व राईट या शब्दाचे उच्चार प्रमाणे स्पेलिंग वेगळे तयार होते. Listen and write.वाचन कौशल्य विकसित करण्यासाठी लक्षपूर्वक वाचन विद्यार्थ्यांनी करावे म्हणजे कौशल्य विकसित होईल.
आकलन पूर्वक वाचन
मित्रांनो, वाचन कौशल्य विकसित करण्यासाठी आकलन पूर्वक वाचन हा एक अतिशय महत्त्वपूर्ण उपाय किंवा घटक आहे याकडे जास्तीत जास्त काळजीपूर्वक लक्ष देण्याची विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून गरज आहे.
विद्यार्थी मित्रांनो, वाचन करण्यासाठी हाती घेतलेले कोणतेही पुस्तक किंवा कोणत्याही प्रकारचा मजकूर चा तपशील वाचनासाठी हाती घेतला असता त्याचा आपणास तपशीला अर्थ करणे आवश्यक आहे. विषयाचे संपूर्ण वाचन करताना आकलन झाल्याशिवाय पुढील माहिती लक्षात राहणार नाही. याकरिता आकलन होईल अशाच प्रकारे वाचन करावे. .
आकलना सह वाचन प्रकाराच्या पाठीमागचा मुख्य अर्थ विद्यार्थ्यांच्या लक्षात आला तर वाचन करणे आणि लक्षात ठेवणे सोपे जाईल. यासाठी पुरेशा ज्ञानाचा वापर करून नउमाजलेल्या शब्दाचा वारंवार नुसते पाठांतर करून परीक्षा साठी ते पूर्णपणे पाठविल्यास योग्य नाही. म्हणूनच कोणत्याही पुस्तकाचे वाचन करताना आकलन होईल अशाच प्रकारे वाचन करावे. ऐनवेळी ऐनवेळी नुसते पाठांतर करणे योग्य नसते. ते धोक्याचे असते. आपण पाठांतर करत आहोत त्या माहितीचे आपणास खरोखर आकलन झाले का हे महत्त्वाचे असते. आकलन झाले तर त्या आकलनाचा वापर परीक्षेत विद्यार्थी उपयोजन करू शकते. आकलनावर आधारित प्रश्न हे परीक्षेत वारंवार विचारले जातात. वाचन कौशल्यावर आधारित उपयोजनात्मक आकलन प्रश्नाचे उत्तर विद्यार्थ्यांना परीक्षेत लिहिण्यास मदत होते.Reading Skill In Marathi Mahiti
शब्दसाठा पूर्वक वाचन
मित्रांनो, वाचन कौशल्य विकसित करण्यासाठी शब्द साठा पूरक वाचन हा घटक किंवा उपाय याबाबत माहिती येथे पाहूया. आपण वाचलेला मजकूर व्यवस्थित आकलन होत नसल्याचे कारण आपल्यापुढे येते आहे. ते कारण म्हणजे आपल्याकडे शब्द साठवण्यासाठी शब्द मर्यादा फार कमी आहेत. शब्दाचा साठा वाढवण्याची गरज आहे. आपल्या वाचन कौशल्यातील दररोज नियमित जे आपण वाचन करता त्या वाचनातील नवनवीन शब्द म्हणी वाक्यात उपयोग समानार्थी शब्द व विरुद्धार्थी शब्द इत्यादी शब्दांचे अर्थ आपणास साठवून ठेवून नीट समजण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शब्दाचा साठा उपलब्ध करण्याची गरज आहे. वाचन करताना नुसता शब्दाचा नुसता करून ठेवणे गरजेचे नसून केलेल्या शब्दाचा आपणास नीट अर्थ कळणे आवश्यक आहे आपला शब्दाचा साठा अपुरा आहे. जो शब्दाचा साठा आपल्याकडे आहेत त्याचे अर्थ आपल्याला नीट आकलन झालेले नाही. यासाठी मित्रांनो शब्दाचा साठा अर्थपूर्ण रीतीने वाचन करून साठवून ठेवणे आवश्यक आहे. .
आपला शब्दाचा साठा वाढवण्याचे अनेक मार्गही सुद्धा आहेत. ते सर्व मार्ग आपण शोधून काढणे गरजेचे आहे. शब्दकोशातील किंवा ज्ञानकोशातील किमान दररोज पाच शब्द अर्थासह नियमित वाचन करून पाठ करून संग्रह वाढवता येतो. वाढवलेल्या शब्दाचा प्रयोग आपण माहिती लिहिण्यासाठी करू शकता. "Reading Skill In Marathi Mahiti" लेखक किंवा कवी कडे भरपूर प्रमाणात शब्दसाठा उपलब्ध असल्यामुळे ते चांगल्या प्रकारचे लिखाण काम करू शकतात.
आपण केलेल्या शब्दाचा बोलताना सुद्धा वापर करणे आवश्यक आहे.
समजा तुम्ही एखाद्या ठिकाणी व्याख्यान देण्यासाठी गेले असता तेथे व्याख्यान देऊन चर्चासत्र आयोजित केले जातात आणि वादविवाद स्पर्धा ही सुद्धा घेतली जाते. अशा कार्यक्रमास आपण उपस्थित रहावे. त् आपल्या भाषणातून आणि चर्चासत्रातून विविध शब्दांच्या अर्थासह दिलेल्या छटा लक्षात जाणीवपूर्वक वापर करा. मन मोकळेपणाने व्याख्यान द्या. यासाठी आपल्याकडून चांगली उत्तम दर्जाची पुस्तके नियमित वाचन करून त्या पुस्तकातील योग्य अर्थाच्या शब्दांचा साठा आपल्या नोंदवहीत नोंद घेऊन नियमित बोलताना आणि लिहिताना वापर करा.Reading Skill In Marathi Mahiti
अधोरेखन पूरक वाचन
वाचन कौशल्य विकसित करण्यासाठी महत्त्वपूर्ण शब्द अधोरेखित करणे आवश्यक असते. यालाच आपण हायलाईट असे म्हणतो. आपल्या दररोजच्या नियमित वाचनात महत्त्वाची जी पुस्तके आपण वापरत असतो त्या पुस्तकातील महत्त्वपूर्ण असणारे शब्द मित्रांनो हायलाईट करत चला हायलाईट केल्याची सवय स्वतःला लावून घ्या म्हणजेच आपण जो मुख्य शब्द आहेत तो शब्द वेगळ्या रंगाने दर्शवून दुसऱ्यालाही सुद्धा वाचताना महत्त्वाचे मुद्दे सहज लक्षात येईल. वाचन कौशल्याची ही भूमिका फार महत्त्वाची आहे. वार्षिक परीक्षेमध्ये सुद्धा उत्तरपत्रिका लिहिताना तुम्ही वापरलेले महत्त्वपूर्ण शब्द अधोरेखित करणे गरजेचे आहेत. पेपर तपासणी करताना पेपर तपासणाऱ्यावर प्रभाव पडतो. परीक्षेत गुणही सुद्धा चांगले प्राप्त होऊ शकते. .
पहिल्यांदा पुस्तक वाचन पूर्ण करा. पुस्तक वाचन केल्यानंतर दुसऱ्यांदा वाचनास सुरुवात करा. यावेळी वाक्यं वाक्य वाचत असताना त्या वाक्यातील जो शब्द आपल्याला महत्त्वाचा वाटतो तो शब्द वेगळ्या शाईने हायलाईट करून म्हणजेच अधोरेखित करून वेगळा दाखवा. हायलाईट केलेल्या शब्दाचा अर्थही जाणून घ्या. वाचन कौशल्य सुधारण्यासाठी आता तर सर्व ठिकाणी महत्त्वाचे मुद्दे वाचकांसाठी हायलाईट करून ठेवले जातात. हायलाईट केलेले मुद्दे म्हणजे दुसरे तिसरे काही नसून संपूर्ण उतारा किंवा पॅरेग्राफ चा अर्थ स्पष्ट करण्यात एकमेव शब्द उपयोगी पडतो.
उपरोक्त दर्शविल्याप्रमाणे वाचनाची सवय वाढवण्यासाठी महत्वपूर्ण उपाय चा परिपूर्ण अभ्यास आपण केला आहे. आता आपण वाचनाच्या संदर्भात खालील काही महत्त्वपूर्ण मुद्दे विचारात घेऊया. Reading Skill In Marathi Mahiti
वाचन कौशल्याचा वेग वाढवा
मित्रांनो, आपण वाचन तर करत असतो परंतु वाचनाचा वेग फार कमी किंवा फार जास्त असायला नको. वाचनाचा वेग किमान स्वरूपात असला पाहिजे. सर्वसाधारणपणे आपणाला वाचनाच्या वेगासाठी एका मिनिटात 200 शब्द वाचू शकत असेल तर तुमचा वाचन वेग एका मिनिटाला 200 शब्द एवढा होईल.
परंतु या किमान एका मिनिटात दोनशे शब्द वाचत असताना 200 शब्दांपैकी आपणास फक्त100 शब्दाचेच आकलन झाले असेल तर तुमचा वाचनाचा वेग प्रति मिनिट 200 शब्द नसून प्रति मिनिट 100 शब्द वाचनाचा वेग निश्चित होतो. याचाच अर्थ वाचताना सर्व शब्दांचे अर्थ समजणे आवश्यक आहे. आकलना सहवाचन म्हणजेच आपले अर्थपूर्ण वाचन होय. जीवनात आपण वाचनाचा वेग कितीही वाढू शकतो पण अर्थासहित वाचण्याचा वेग निम्मा असेल. Reading Skill In Marathi Mahiti
वाचन कसे असावे
अभ्यासाला बसताना पुरेशा प्रकाशामध्ये बसावे. वाचन प्रक्रिया करण्यास सुरुवात करताना ताठ बसून वाचावे. वाचताना वाचनाची सुरुवात डावीकडून उजवीकडे आपली दृष्टी ठेवून पहिली ओळ वाचल्यानंतर दुसऱ्या खालच्या ओळीवर सलगपणाने हळूच खालच्या ओळी कडे नजर फिरवा. पुन्हा तीच प्रक्रिया सुरू करा. अशा रीतीने एक एक करून सर्व ओळी वाचणे. आकलन होईल याप्रमाणेच वाचन करावी. वाचायचे म्हणून वाचायचे असे करू नका. यामध्ये आपलाच फार मोठा तोटा होणार आहे. याची जाणीव ठेवून या लेखामध्ये दर्शविल्याप्रमाणे वाचन कौशल्याचा वापर करणे आवश्यक आहे.Reading Skill In Marathi Mahiti
वाचनाचा वेग वाढवण्याचे नियम
वाचन कौशल्य विकसित करताना वासनाचा वेग वाढवण्याचे नियम आपणास माहीत असणे आवश्यक आहे. करिता येथे खालील प्रमाणे या लेखात स्पष्टपणे नमूद करण्यात येत आहे.
1) आपला वाचनाचा वेग तू व्यवस्थित ठेवण्यासाठी आपल्या डोळ्याच्या नजर डावीकडून उजवीकडे शब्द समुदायाच्या माध्यमातून जलद हालचाल महत्त्वाची असणे आवश्यक आहे.
2) डावीकडून उजवीकडे आपण फक्त एका वेळी एकच वळ वाचावी.
3) आपल्या वाचनाचा वेग ज्याप्रमाणे वाढत जाईल त्याप्रमाणे अधिकाधिक शब्द एका नजरेच्या टप्प्यात अनेक शब्द आपणास दिसणे गरजेचे आहे.
4) वाचनाच्या वेळी एका वेळी जेवढे जास्तीत जास्त शब्द आपल्या एकाच नजरेच्या औकात एकाच वेळी आणू शकाल तेवढ्या प्रकारे तुमचा वाचण्याचा वेग वाढल्याशिवाय राहणार नाही.
वाचन कौशल्यात हे टाळा.
- वाचन कौशल्य वाढवत असताना महत्त्वपूर्ण खालील मुद्दे जाणीवपूर्वक टाळणे अपेक्षित आहे.
- घरात टीव्ही सुरू असताना टीव्ही समोर बसून वाचन करू नये.
- रेडिओ ऐकत वाचन करू नये.
- वाचन करताना शक्यतो गोंगाटा वातावरणात वाचन करू नका.
- फार मोठ्या आवाजा त वाचन काम करू नका.
- तोंडाने पुट पुट करत अभ्यास करू नका.
- पुस्तकाच्या शब्दांच्या ओळीवर बोट ठेवून वाचन करू नका.
- ओळीवर पेन किंवा पेन्सिल फिरून वाचन काम करू नका.
- हातपाय हलवत वाचन करू नका.
- मान व डोके हलवत अभ्यास करू नका.
- झोपून किंवा रेलून अभ्यास करू नका.
- वाचताना शब्दांमध्ये तुटकपणा आणू नका.
सारांश
मित्रांनो, वाचन कौशल्य विकसित करण्यासाठी ह्या लेखातून महत्वपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. वाचन कौशल्य म्हणजे काय हे सांगून वाचन कौशल्याचे फायदे स्पष्ट करण्यात आले आहे. त्याचबरोबर वाचन कौशल्याचे विविध असणारे प्रकाराचे स्पष्टीकरण देण्याचा यशस्वी प्रयत्न करण्यात आला. प्रकारानंतर वाचन कौशल्य विकसित करणारे उपाय स्पष्ट करण्यात आले. वाचन कौशल्याचा वेग वाढवण्याची गरज प्रतिपादन केली आहे. त्याचबरोबर वाचन वेग वाढवण्यासाठी काही महत्त्वपूर्ण सूचना स्पष्टपणे लेखात नमूद केल्यानंतर वाचन करताना कोणत्या गोष्टी टाळाव्यात याबाबत सविस्तर स्पष्टीकरण या लेखामार्फत पूर्ण केले आहेत.
मित्रांनो, आपण हा लेख वाचल्यानंतर लेखांमध्ये आपणास काही तांत्रिक समस्या निर्माण झाल्यास किंवा काही त्रुटी आढळून आल्यास आपण आपल्या प्रतिक्रिया आणि त्रुटी या ब्लॉगच्या ब्लॉग पोस्ट कॉमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा. जर आपण सुचवलेल्या सूचना प्रतिक्रिया किंवा त्रुटी योग्य असल्यास त्वरित या लेखांमध्ये सुधारणा करून लेख अद्यावत करण्यात येईल.
FAQ
1) वाचन कौशल्याचे किती प्रकार आहेत?
उत्तर-वाचन कौशल्याचे पाच प्रकार आहे.
2) शब्द वाचनातील हायलाईट करण्याचे मुख्य कारण कोणते?
उत्तर-संपूर्ण शब्दाचे अर्थासह महत्वपूर्ण शब्दाचे आकलन होण्यासाठी वाक्यातील ठराविक शब्द हायलाईट केले जातात.
3) वाचन कौशल्य विकसित करण्याचे किती उपाय आहेत?
उत्तर-वाचन कौशल्य विकसित करण्याचे पाच उपाय आहे.
4) चित्राचे वाचन हा प्रकार कोणत्या विषयासाठी सर्वात जास्त उपयुक्त ठरतो?
उत्तर-भूगोल व भाषा विभागासाठी चित्राचे वाचन हा प्रकार सर्वात जास्त उपयुक्त ठरतो.
5) व्याख्यान करण्यासाठी सर्वात महत्त्वाची वाचन कौशल्यातील कोणती गोष्ट महत्वपूर्ण आहे.
अर्थपूर्ण शब्दांचा साठा वाढवणे महत्त्वाची वाचन कौशल्यातील महत्त्वपूर्ण गोष्ट आहे.
अधिक माहितीसाठी आपण आमचे खालील लेख आवश्यक वाचा.