आयात व निर्यात मराठी माहिती | Export And Import Marathi Mahiti
प्रस्तावना
Export And Import Marathi Mahiti मित्रांनो, आज आपण आयात व निर्यात मराठी माहिती या विषयावर आधारित माहिती ब्लॉग पोस्ट लेखासाठी माहिती या लेखातून पाहू.या. मित्रांनो आजच्या आधुनिक युगात त आयात निर्यातीला फार महत्व आल्यामुळे या नावीन्यपूर्ण विषयावर लेखांमधून माहिती चा सविस्तर अभ्यास करू या. हा लेख वाचल्यानंतर आपणास लेख आवडल्यास आपल्या वाचक प्रेमी मित्रांना वाचण्यासाठी आवश्यक शेअर करावा.
मित्रांनो, सर्वसामान्यपणे आयात म्हणजे भारत सोडून इतर देशाकडून इतर देशाने उत्पादित केलेल्या वस्तूची मागणी इतर प्रदेशाकडे करणे किंवा इतर प्रदेशातून त्या वस्तू खरेदी करून भारतात आणून त्या वस्तूचे योग्य दराने वितरण करणे होय .
मित्रांनो, निर्यात म्हणजे सर्वसामान्यपणे साध्या व सोप्या भाषेत स्पष्ट करावयाचे असल्यास ते पुढील प्रमाणे स्पष्ट करूया. आपल्या देशामध्ये उत्पादित झालेला झालेले उत्पादन हे परदेशामध्ये त्या देशाच्या मागणीवरून त्यांना उत्पादित झालेले उत्पादन योग्य दराने दुसऱ्या देशाला विकणे. हा सर्वसामान्यपणे अर्थ विचारात घेतला जातो. शास्त्रीय पद्धतीने आपण आता या लेखाच्या संदर्भात सविस्तर चर्चा पुढील प्रमाणे करू या.
Export And Import Marathi Mahiti |
Export And Import Marathi Mahiti(toc)
आयात व निर्यात धोरण स्पष्टीकरण
मित्रांनो, आपण आयात व निर्यात याबाबत सविस्तर शास्त्रीय पद्धतीने व्यक्त केलेली माहिती पाहूया.
आयात व्यापार
आयात म्हणजे जगातील कोणत्याही जगातील एका देशाने उत्पादित केलेल्या वस्तू किंवा सेवा ह्या दुसऱ्या देशाला गरज असल्यामुळे आंतरराष्ट्रीय दराने खरेदी करून विकत घेणे म्हणजेच आयात होईल. आयात म्हणजे दुसऱ्या देशाकडून आपल्या देशात वस्तू मागवणे होय. यालाच इंग्रजीमध्ये इम्पोर्ट असे म्हणतात.आयात म्हणजे एका देशात खरेदी केलेली वस्तू किंवा सेवा जी दुसऱ्या देशात उत्पादित केली जाते . आयात आंतरराष्ट्रीय व्यापारातील महत्त्वपूर्ण घटक घटक आहे. ज्यावेळेस एखाद्या देशाने वस्तूचे किंवा सेवेचे मूल्य त्यांच्या निर्यातीच्या पेक्षा जास्त असेल तर त्यावेळेस आंतरराष्ट्रीय व्यापाराचा समतोल हा नकारात्मक होऊन व्यापारामध्ये तूट येते.' Export And Import Marathi Mahiti' आयात मध्ये इतर देशाकडून वस्तू खरेदी केल्या जातात.
निर्यात व्यापार
निर्यात म्हणजे एखाद्या देशामध्ये उत्पादित झालेले उत्पादन, वस्तू किंवा सेवा या संदर्भात दुसऱ्या देशातील खरेदीदारांना विकल्या जाणाऱ्या वस्तू होय. निर्यातीमध्ये इतर देशाकडून वस्तू विकत घेतल्या जातात.
आंतरराष्ट्रीय व्यापार
एका देशातून दुसऱ्या देशात वस्तू विकणे किंवा खरेदी करणे यामध्ये एक प्रकारचा दोन देशांमध्ये आयात व निर्यात संदर्भामध्ये वस्तू सेवा आणि उत्पादन यांच्यामध्ये होणाऱ्या व्यापाराला आंतरराष्ट्रीय व्यापार (International Trade) असे म्हणतात. इंग्लिश मध्ये त्याला इंटरनॅशनल ट्रेड असे म्हणतात. यालाच पुढे( बॅलेन्स ऑफ ट्रेड)Balance Of Trade And Balance Of Payment(बॅलेन्स ऑफ पेमेंट) अशी सुद्धा आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या संदर्भाने संकल्पना पुढे आल्या आहेत.निर्यात म्हणजे वस्तू आणि सेवा ज्या एका देशात उत्पादित केल्या जातात आणि दुसऱ्या देशात खरेदीदारांना विकल्या जातात. निर्यात, आयाती सह निर्माण होणाऱ्या धोरणालाच अर्थशास्त्रामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार असे म्हटले जाते. iआंतरराष्ट्रीय व्यापाराच्या संदर्भाने आयात व निर्यात या धोरणाबाबत सविस्तर चर्चा या प्रकरणा त मधून आपण करणार आहोत.
आयातीचे प्रकार
मित्रांनो सर्वसामान्यपणे, आंतरराष्ट्रीय व्यापार करत असताना एका देशाकडून दुसऱ्या दिशेकडे किंवा दुसऱ्या देशाकडून एका देशाकडे होणारा हा आंतरराष्ट्रीय व्यापार महत्त्वपूर्ण असून यातील एक महत्त्वपूर्ण घटक म्हणजे आयात होय. या आयातीच्या संदर्भात आयातीचे प्रकार बाबत पुढील प्रमाणे माहिती पाहू या.
आयातीचे मुख्य दोन प्रकार आहेत.
1) औद्योगिक व उपभोग्य संदर्भातील आयात
2) मध्यवर्ती वस्तू व सेवा संदर्भातील आयात
या दोन्ही प्रकारच्या आयातीच्या संदर्भात माहिती जाणून घेऊया.
औद्योगिक व उपभोग्य संदर्भातील आयात.
एखाद्या देशामध्ये औद्योगिक स्वरूपाच्या वस्तू निर्माण होत नसेल किंवा निर्माण झालेल्या वस्तू या लोकसंख्येच्या प्रमाणात वितरण करण्यासाठी त्या वस्तूचा पुरवठा कमी होत असेल आणि त्या वस्तू व्यक्तींना उपभोगण्यासाठी आवश्यक असल्यामुळे अशा उत्पादित औद्योगिक वस्तू ची मागणी आयात धोरणाच्या मार्फत केली जाते त्या धोरणाला औद्योगिक व उपभोग्य संदर्भातील असे म्हणतात.
मित्रांनो भारतामध्ये 1974 आणि 75 मध्ये फार मोठा दुष्काळ पडला. त्यावेळेस भारतामध्ये लोकांना खाण्यासाठी अन्न धान्याचा साठा फार कमी होता. त्यावेळेस भारताने भारतीय लोकांना अन्नधान्याचा योग्य पुरवठा करण्यासाठी अमेरिकेकडून गहू आणि ज्वारी आयात करून भारताची त्यावेळी ची दुष्काळ परिस्थितीतील मागणी आयातीद्वारे पूर्ण केली. Export And Import Marathi Mahiti त्यावेळेस भारतीय अर्थव्यवस्थेला गहू आणि ज्वारी प्रचंड मोठ्या दराने अमेरिकेकडून खरेदी करावी लागली.
मध्यवर्ती वस्तू आणि सेवा संदर्भातील आयात
वस्तू आणि सेवा संदर्भामध्ये प्रत्येक देशामध्ये आयात होत असते. वस्तू म्हणजे एखाद्या देशाने निर्माण केलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू होय. उदाहरणार्थ मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक साहित्य त्याच बरोबर सेवा म्हणजे वकील, डॉक्टर आणि शिक्षक यांनी केलेली सेवा ही होय. इंग्लंड या देशांमध्ये इंग्लंडने आपल्या देशाकडून सेवाच्या संदर्भामध्ये डॉक्टर आणि वकील यांची आयात देशातील लोकांच्या सेवा पूर्ण करण्यासाठी भारताकडून आयात केल्या.
भारताने सुद्धा अनेक देशाकडून विमान, रायफली आणि इलेक्ट्रॉनिक साहित्य देशात आयात करून घेतले आहे. ज्या देशांमध्ये वस्तू आणि सेवा यांच्या संदर्भात कमतरता असते परंतु त्या वस्तू शिवाय किंवा सेवा देशाची गरज पूर्ण होत नसल्यामुळे त्या वस्तू बाहेरच्या देशाकडून आयात करण्याच्या किंवा सेवा आयात करण्याच्या धोरणाला वस्तू व सेवा संदर्भातील आयात असे म्हणतात. या संदर्भातही सुद्धा हा आंतरराष्ट्रीय व्यापारच आहेत.
आयात व निर्यात धोरण
आयात आणि निर्यात संदर्भामध्ये एकत्रित माहिती आपण पुढील प्रमाणे अभ्यासू या.आपल्या भारतात म्हणजेच आपल्या माय देशात इतर देशाकडून वस्तू आणि सेवा देशाच्या गरजेनुसार खरेदी करणे म्हणजेच परदेशातून खरेदी करण्याच्या धोरणाला आयात धोरण असे म्हणतात.आपल्या माय भारत देशातून म्हणजेच भारताला परदेशात दुसऱ्या देशाला वस्तू आणि सेवा यांची विक्री करणे विक्री करणे म्हणजेच निर्यात होईल. यालाच देशाचे निर्यात धोरण अशी सुद्धा म्हटले जाते.
आयातदार काय करतो?
आयातदार हा परदेशातील वस्तू खरेदी करणारा देश होय. आयातदार देशाला एखादी फार मोठ्या प्रकारची औद्योगिक स्वरूपाची कंपनी उभारायची असेल. पण या कंपनीसाठी लागणारा यंत्र आणि कच्चामालांचा साठा देशाकडे उपलब्ध नाही. त्यावेळी आयातदार देश हा औद्योगिक कंपनी उभारण्यासाठी आपल्या कंपनीला लागणारा कच्चामाल आणि यंत्रसामुग्री याबाबत परदेशातून वस्तूची खरेदी करून आपल्या देशात लागणाऱ्या उद्योग धंद्याला किंवा औद्योगिक कंपनीला आवश्यक तो साठा इतर देशाकडून उपलब्ध करणारा देश म्हणजे आयातदार देश होय. इंग्लंड मध्ये 1850 मध्ये औद्योगिक क्रांती झाली. पण तिथे औद्योगिक कंपन्यांसाठी कच्चामाल इंग्लंड या देशाने इतर देशातून म्हणजेच भारतातून खरेदी केला. त्यावेळी इंग्लंड हा आयातदार देश ठरला.आयातदार परदेशी पुरवठादाराकडून उत्पादने खरेदी करीत असतो." Export And Import Marathi Mahiti" आपण आपल्या स्वतःच्या आपल्या गरजेनुसार वापरासाठी वस्तू किंवा सेवा आयात करू शकता.
आपल्या व देशाने नवीन तंत्रज्ञानाच्या साह्याने काही महत्त्वपूर्ण वस्तू तयार केल्या आहेत. आपणास या वस्तूचा परदेशामध्ये इतर देशाला कच्चामाल म्हणून उपयुक्त ठरत असेल तर किंवा इतर देशाने तयार केलेला तयार केलेल्या वस्तू तयार करण्यासाठी कच्चामाल म्हणूनतुम्हाला परदेशातून काही विशिष्ट कच्चा माल खरेदी करत असाल तर अशा धोरणाला अर्थशास्त्रामध्ये अर्ध-फॅब्रिकेट्सची आवश्यकता असते.
निर्यात व्यवसाय कसा चालतो?
निर्यात हा एक प्रकारचा व्यवसाय आहेत. जेव्हा एखाद्या देशाला किंवा एका देशातील कंपनीला किंवा इतर खरेदीदार देशांना आपल्या वस्तू आणि सेवा विकते . यावरच निर्यात व्यवसाय आधारित असतो. निर्यात म्हणजे वस्तू किंवा सेवा ज्या आपल्या देशातून इतर देशांमध्ये पाठवल्या जातात. निर्यातदार व्यवसाय हा आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचा आहे. कारण देशातून एका वस्तूची विक्री दुसऱ्या देशात होते त्यामुळे आपल्या देशाच्या आर्थिक व्यवस्थेमध्ये दुसऱ्या देशाचे भांडवल आर्थिक स्वरूपात प्राप्त करून देशाचा विकास हा निर्यातीवर अवलंबून आहे. जो देश जास्त निर्यात दार असेल तो देश लवकरच विकसनशील व विकसित देश म्हणून जगात गणल्या जातो. अशा देशालाच निर्यातदार देश असे म्हणतात. निर्यातदार हा वस्तूची विक्री करतो. केलेल्या विक्रीतून प्रचंड प्रमाणात नफा प्राप्त करत असतो.
आयातदार काय करतो?
आयातदार देश हा इतर देशातील पुरवठादाराकडून त्यांनी उत्पादित केलेल्या किंवा एखाद्या देशाने उत्पादित केलेल्या वस्तूची उत्पादने तसेच संबंधित देशातील सेवा ठराविक निर्धारित दरात खरेदी इतर देशाकडून प्राप्त करत असतो.
समजा तुमच्याकडे एक दुकान आहे. दुकानांमध्ये विक्रीसाठी साखर कमी पडली आहे. त्यावेळेस तुम्ही इतर पुरवठादाराकडून ती वस्तू खरेदी करून आपल्या ग्राहकांच्या सेवेसाठी आपल्या दुकानात उपलब्ध करून घेण्याची परिस्थिती म्हणजेच आयातीचे धोरणच होय. भारतामध्ये अनेक वस्तू पूर्वीच्या काळी उत्पादित नसलेल्या भारताने इतर देशाकडून प्रचंड दराच्या साह्याने वस्तू खरेदी करून देशवासीयांना प्राप्त करून दिल्या. आर्यातदार देश हा परदेशाकडून किंवा एखाद्या पुरवठादाराकडून विशिष्ट प्रकारचे आपल्याकडे उपलब्ध नसलेलेउत्पादने खरेदी करतो . तुम्ही तुमच्या स्वतःच्या वापरासाठी आयात करू शकता. उदाहरणार्थ, तुम्ही वस्तू तयार केल्यामुळे आणि तुम्हाला परदेशातून काही विशिष्ट कच्चा माल किंवा अर्ध-फॅब्रिकेट्सची आवश्यकता असते.
भारतात निर्यात महत्त्वाची का आहे?
आपल्या भारत देशाला अनेक वस्तूचे प्रचंड प्रमाणात उत्पादन करून ते इतर देशांना त्यांच्या गरजेनुसार आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कमी दराने किंवा जास्त दराने आंतरराष्ट्रीय दराच्या संदर्भाने वस्तूची निर्यात करणे अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. जर देशाने निर्यात केल्यास देशाला परदेशाची परकीय चलन प्राप्त होते. त्या चलनाच्या द्वारे आपल्या देशाचा विकास करण्यासाठी फायदा होऊ शकतो. आजच्या आधुनिक युगात भारत देशा अनेक वस्तूच्या बाबत निर्यातदार देश म्हणून विकसित होत आहे. भारतामधून साखर आणि कांदा बऱ्याच प्रमाणात निर्यात केला जातो. त्यामुळे परकीय चलन प्राप्त होते. देशाची अर्थव्यवस्था परकीय चलनाद्वारे विकसित होते.
भारत सध्या अनेक वस्तूचे उत्पादन निर्यात करून भारतीय अर्थव्यवस्था मजबूत करण्याचा सतत भारताचा प्रयत्न सुरू आहेत. निर्यात वाढीमुळे अनेक व्यवसायदारांनाही त्यांचा व्यवसाय वाढवण्यास मदत होते. व्यवसाय दारांनी भरपूर प्रमाणात वस्तू निर्माण केल्यास त्या वस्तू व्यवसाय दार निर्यात करून आपला व्यवसाय भारतात वाढू शकतो. आंतरराष्ट्रीय व्यापार हा कोणत्याही व्यवसाय दारांना केंद्र सरकारच्या धोरणाच्या अंतर्गत पूर्व परवानगी घेतल्याशिवाय खाजगी व्यवसाय धारकांना निर्यात करण्याचा अधिकार नाही. निर्यात करण्याचा अधिकार फक्त भारत देशालाच आहे. कोणत्याही घटक राज्यातही सुद्धा वस्तूचे उत्पादन प्रचंड झाले तर घटक राज्याला निर्यात करायची असल्यास केंद्र सरकारच्या परवानगीशिवाय घटक राज्य सरकार यांनाही सुद्धा त्या निर्यात करता येत नाही. निर्यातीमुळे महसूल आणि विक्री प्रचंड प्रमाणात वाढ झाल्यामुळे देशाचा अर्थव्यवस्थेचा कणा बळकट होतो.
इंग्लंडने 1850 ची क्रांती औद्योगिक क्रांती करून इंग्लंडला विकसित केले. जगातील अनेक देशावर इंग्रजाची सत्ता असल्यामुळे त्यांनी तेथून कच्चामाल आपल्या स्वतः मायदेशी घेऊन गेला आणि कच्च्या मालाचे रूपांतर पक्क्यामाला करून इतर देशांना त्या वस्तू इतर देशांना जास्त दराने निर्यात केल्या. त्यामुळे 1850 च्या क्रांतीत इंग्लंडचा प्रचंड प्रमाणात विकास झाला.
व्यापार आणि अनुपालन म्हणजे काय?
आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यापार व व्यापाराची अनुप पालन करण्यासाठी विशिष्ट प्रकारचे धोरण निर्माण करण्यात आली आहे. सर्वसाधारणपणे कोणत्याही देशातील होणारा अंतर्गत किंवा आंतरराष्ट्रीय व्यापार हा देशातील अनुपालनाचा एक अष्टपैलू आहे. तो सुनिश्चित करण्यात आलेला असतो. आयात आणि निर्यात हा व्यवहार दोन किंवा अनेक देशांच्या मध्ये घडून आलेला व्यापार असतो.
आंतरराष्ट्रीय स्तरावर म्हणूनच आयात आणि निर्यात व्यापार करताना दोन्ही देशांचे कायदे हे आंतरराष्ट्रीय व्यवहाराच्या नियमाची सुसंगत असावी लागते. समजा आपल्याला एखाद्या वस्तूची पाकिस्तान कडून खरेदी करण्याची इच्छा असली तरी सुद्धा आपण करू शकत नाही कारण दोन देशांमधील आंतरराष्ट्रीय संबंध सलोख्याचे असणे आवश्यक आहे. जर दोन देशांमध्ये आंतरराष्ट्रीय संबंध हे सलोख्याचे नसेल किंवा परराष्ट्र धोरण देशाने ठरवताना इतर देशाच्या संदर्भाने आंतरराष्ट्रीय स्तरानुसार ठरवणे योग्य आहे.
एका देशाकडून दुसऱ्या देशाकडे निर्यात आणि आयात असतांतरीत करण्यासाठी वस्तूच्या उत्पादनाच्या संदर्भाने अनुपालन धोरण सर्वोत्तम पद्धतीचे असणे आवश्यक आहे. म्हणजेच दोन्ही देशातील आंतरराष्ट्रीय व्यापार व परराष्ट्र धोरण सहकार्याची असणे आवश्यक आहे.त्यामुळे दोन्ही देशांमध्ये मालांच्या बाबत अनुपालन योग्य होते.
सारांश
आयात व निर्यात धोरण आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये महत्त्वपूर्ण आवश्यक अनुपालन करणारे धोरण असणे आवश्यक आहे. कारण जगातील कोणताही देश सर्वच वस्तूचे उत्पादन करण्यास आज जगात उपलब्ध नाहीत. काही देशांमध्ये धन धान्याचे उत्पादन होते. तर काही देशांमध्ये तेलाचे उत्पादन प्रचंड प्रमाणात असते. तर काही देशांमध्ये इलेक्ट्रॉनिक साहित्य तयार होते. काही देशांमध्ये साखर जास्त प्रमाणावर उत्पादन होते. तसेच काही देशांमध्ये सैनिकी साहित्य जास्त प्रमाणात उत्पादित केले जाते.
जगातील कोणताही देश प्रादेशिक विविधता असल्यामुळे आणि आंतरराष्ट्रीय वातावरण आणि पर्यावरण वेगवेगळ्या प्रकारचे असल्यामुळे वेगवेगळ्या वस्तू वेगवेगळ्या देशात उत्पादित होत असतात. होणाऱ्या उत्पादित वस्तू दुसऱ्या देशात उत्पादित होईलच हे सांगता येत नाही. संपूर्ण जगामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार हा एकमेकांवर अवलंबून आहेत.
जगातील एकही देश स्वयंपूर्ण नसल्यामुळे अनेक देशांना बऱ्याच वेळेस वस्तूची निर्यात करावी लागते तर कधी आयात करावी लागते. निर्यात आणि आयात ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. दोन्ही बाजूचा संपूर्ण अभ्यास केल्याशिवाय आंतरराष्ट्रीय व्यापार ज्याला आपण इंटरनॅशनल ट्रेड असे म्हणतो ते पूर्ण होत नाही. म्हणूनच बॅलेन्स ऑफ पेमेंट आणि बॅलन्स ऑफ ट्रेड यामध्ये समतोल साधण्याची गरज असल्यामुळे सर्वच देशांना आयात व निर्यात धोरणावर अवलंबून राहावे लागते. देशाची संपूर्ण अर्थव्यवस्था ही आयात आणि निर्यात या मुख्य व्यापाराच्या तत्त्वावर अवलंबून असते.
व्यापार हा देशांतर्गत असो की आंतरराष्ट्रीय असो परंतु आयात आणि निर्यात धोरण जगातील सर्व राष्ट्रांसाठी महत्त्वाचे धोरण म्हणून जागतिक बँकेने तसेच इंटरनॅशनल मॉनिटरी फंड त्याचबरोबर संयुक्त राष्ट्र संघाने या धोरणाबाबत विशिष्ट प्रकारचे नियम तयार केले आहेत आणि त्या नियमाच्या आधारेच निर्यात आणि आयात धोरण निश्चित करून जगातील आंतरराष्ट्रीय व्यापार सु निश्चित केला जातो. म्हणूनच आपण आजच्या या लेखातून आयात व निर्यात मराठी माहिती अंतर्गत संपूर्ण माहिती या लेखातून देण्याचा प्रयत्न केला आहे. याबाबत जर आपणास काही तांत्रिक त्रुटी आढळून आल्यास तर आपण ब्लॉगच्या कॉमेंट बॉक्स मध्ये आपल्या त्रुटी आणि प्रतिक्रिया आवश्यक कळविणे. आपण दिलेल्या त्रुटी आणि प्रतिक्रिया संपूर्ण तंतोतंत तपासून पाहून त्या योग्य असल्यास त्वरित हा लेख अद्यावत करण्यात येईल.
FAQ
1) आयात म्हणजे काय?
उत्तर-आपल्या देशात उत्पादित न होणाऱ्या किंवा कमी पडणाऱ्या वस्तूंची खरेदी इतर देशाकडून विशिष्ट नियमावर आधारित खरेदी करून वस्तू प्राप्त करणे म्हणजे आयात होय.
2) निर्यात म्हणजे काय?
उत्तर- एखाद्या देशामध्ये प्रचंड प्रमाणात वस्तूचे उत्पादन झाले आणि ते उत्पादन इतर देशांना आंतरराष्ट्रीय स्तरावरून इतर देशाला विक्री करून विक्रीच्या माध्यमातून परकीय चलन प्राप्त करणे म्हणजे निर्यात होय.
3) अर्थव्यवस्थेचा विकास करण्यासाठी आयात व निर्यात धोरणापैकी कोणते धोरण देशा त उपयुक्त ठरेल?
उत्तर- अर्थव्यवस्थेचा विकास करण्यासाठी आयातीपेक्षा निर्यात धोरण अतिशय उपयुक्त ठरवून परकीय चलनाच्या द्वारे अर्थव्यवस्थेचा विकास करता येईल .
4) जगामध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तूचे निर्यात करणारे महत्त्वपूर्ण कोणते देश आहे?
उत्तर चीन व जपान त्याचबरोबर अमेरिका इलेक्ट्रॉनिक वस्तूचे निर्यातदार देश ठरले आहेत.
5) भारताने आतापर्यंत कोणकोणत्या वस्तूची निर्यात परदेशात केली आहे?
उत्तर भारताने आतापर्यंत कांदा, साखर , विविध प्रकारची फळे आणि धनधान्य निर्यात केलेली आहे.
अधिक माहितीसाठी आपण आवश्यक खालील लेख वाचा
जास्तीच्या माहितीसाठी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चा खालील व्हिडिओ आवश्यक पहा.